गोपीनाथ पांडुरंग मुंडे

धडाडीचा लोकनेता- मान्यवरांच्या प्रतिक्रिया

     केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत एका भीषण अपघातात दुःखद निधन झाले. या घटनेने भाजपसह सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. ट्विटर, फेसबुक, विविध वृत्तवाहिन्या आणि अन्य संपर्कमाध्यमांद्वारे मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंडे यांच्या अपघाती निधनाने भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली. मुंडे यांचा मृत्यू धक्कादायक असून, महाराष्ट्राने धडाडीचा लोकनेता गमावला अशा शब्दांत अनेकांनी मुंडे यांना आदरांजली वाहिली.

 • "गोपीनाथ मुंडेच्या निधनामुळे जवळचा मित्र आणि कॅबिनेटमधील उत्तम सहकारी मी गमविला आहे. त्यांच्या निधनाने फार मोठा धक्का बसला आहे. ते लोकाभिमुख नेते होते." - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

 • "सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारा एक झुंजार नेता आपण गमविला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो." - प्रणव मुखर्जी (राष्ट्रपती)

 • "मुंडे यांच्या निधनाने तीव्र धक्का बसला, तळागाळातल्या गरीबांचा, शेतक-यांचा नेता हरपला. भाजपचे मोठे नुकसान. समाजाचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची भुमिका असलेला नेता."- गृहमंत्री राजनाथ सिंह

 • "माझे वरिष्ठ सहकारी असलेल्या मुंडे यांच्या निधनाने तीव्र धक्का बसला, त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत."- केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज

 • "मुंडे यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने तीव्र दु:ख, त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात सहभागी."- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी

 • "लोकप्रिय नेते मुंडे यांच्या निधनाने तीव्र दु:ख, त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात सहभागी, भावपूर्ण श्रद्धांजली."- काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी

 • "गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होते. राजकारणात त्यांची अतिशय प्रदीर्घ व उल्लेखनीय कारकीर्द होती. त्यांची पोकळी सर्वानाच प्रकर्षाने जाणवत राहील." – उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

 • "माझ्या ज्येष्ठ सहका-याच्या निधनाची बातमी ऐकून मला अतिशय मोठा धक्का बसला आहे." – सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री

 • "मुंडेजी आमच्यात नाहीत यावर माझा विश्वासच बसत नाही. हा धक्का मी सहन करू शकणार नाही." – प्रकाश जावडेकर, माहिती व प्रसारणमंत्री

 • "एका अपघातात गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि भाजपच्या दु:खात मी सहभागी आहे." – पी. चिदंबरम, माजी केंद्रीय अर्थमंत्री

 • "मुंडे यांच्या अकाली निधनामुळे धक्का बसला आहे आणि अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे." – अजय माकन

 • "गोपीनाथ मुंडे माझे अतिशय जवळचे मित्र आणि महान नेते होते." – दिग्विजय सिंह, काँग्रेस सरचिटणीस

 • "त्यांच्या निधनामुळे मला धक्का बसला असून, माझा एक चांगला मित्र मी गमावला आहे." – अरुण जेटली, अर्थ व संरक्षण मंत्री

 • "गोपीनाथ मुंडे एक सक्षम आणि जनसेवेला वाहून घेणारे नेते होते." – मेनका गांधी, केंद्रीय महिला व बालविकासमंत्री

 • "दुस-यांच्या दु:खाची जाण असणारे ते नेते होते." – रामविलास पासवान

 • "मुंडे म्हणजे लोकनेता होते व त्यांनी देशातील विशेषत: महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य केले होते." - गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

 • "मुंडे यांच्या निधनामुळे देशातील जनतेने विशेषत: महाराष्ट्रातील जनतेने एक महान संसदपटू,मानवतावादी, खरा देशभक्त व समाजाची अथक सेवा करणारा माणूस गमावला आहे." - जे. जयललिता, तमिळनाडू

 • "गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त पचवणेच फार कठीण होते. ते एक चांगले नेते तर होतेच, पण त्याचबरोबर एक चांगले व्यक्तीही होते. आमचे संबंध अगदी कौटुंबिक जिव्हाळयाचे होते. त्यांच्या जाण्याने अतीव दु:ख झाले. ईश्वर या धक्क्य़ातून त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याचे बळ देवो." - लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका

 • "मुंडे यांच्या निधनाची अतिशय दु:खदायक बातमी, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, भावपूर्ण श्रद्धांजली." - आप नेता अरविंद केजरीवाल

 • "मुंडे यांचे रस्ते अपघातात झालेले निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दु:खदायक आहे. एनडीएची मोठी हानी झाली आहे." - एन. चंद्राबाबू नायडू

 • "आमचे लाडके केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपिनाथ मुंडे यांचे निधाचे वृत्त धक्कादायक आहे." - शिवराज सिंह चौहान

 • "सामान्य कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी असामान्य कर्तृत्त्व गाजवले. देशात दुसरे गोपीनाथ मुंडे हेणे शक्य नाही. महाराष्ट्रात भाजपाची उभारणी करण्यासाठी मुंडे यांनी अपार कष्ट केले. राज्यात भाजपाचा सामाजिक पाया विस्तारण्यासाठी त्यांनी प्रभावी उपाययोजना केल्या होत्या." - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 • "गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची बातमी दु:खद तितकीच धक्कादायक आहे. आपण एक लोकनेता गमावला आहे. मी त्यांना श्रद्धांजली अपर्ण करतो." - शरद पवार

 • "मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. यामुळे मला 4 वर्षे त्यांचा सहवास मिळाला. शिवसेना-भाजपा युती टिकविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. एक मित्र, फर्डे वक्ते आणि बहुजन समाजाचे आधारस्तंभ म्हणून मुंडे यांची कामगिरी अलौकीक आहे." - डॉ. मनोहर जोशी, शिवसेना नेते

 • "विकासाचा दृष्टीकोन असलेले लोकनेते म्हणून गोपीनाथ मुंडेसाहेब केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात परिचीत होते. ग्रामीण जनतेसह समाजाच्या अनेक प्रश्नांची त्यांना बारकाईने जाण होती. त्यामुळेच त्यांच्यावर केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती." - अजित पवार,माजी उपमुख्यमंत्री

 • "राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांसाठी काम करणाऱया काही मोजक्या नेत्यांपैकी गोपीनाथ मुंडे होते. मुंडे यांचे आकस्मित निधन हे अतिशय दुर्दैवी आहे. जिल्हा परिषद गटातील कार्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास सातत्यपूर्ण लोकसेवा आणि लोकसंग्रहाच्या बळावर केंद्रीय मंत्रिपदापर्यंत विस्तारला गेला." - पृथ्वीराज चव्हाण,माजी मुख्यमंत्री

 • "केंद्रीय ग्रामविकासमंत्रिपदी रुजू झाल्यानंतर केवळ आठवडाभरातच गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू होणे दुर्दैवाची बाब आहे. गोपीनाथ मुंडे यांची ओळख एक प्रभावी वक्ता आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडला गेलेला नेता अशी आहे." - के. शंकरनारायणन्, राज्यपाल

 • "महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्त्व करणारे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे महायुतीचा मजबूत आधारस्तंभ हरवला आहे. त्यांच्या निधनामुळे दलित-बहुजन चळवळीचे नुकसान झाले आहे. भाजपाचे नेते असूनही त्यांनी सदैव पुरोगामी चळवळीत सहभाग घेतला होता." - रामदास आठवले, रिपाइं

 • "त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा नव्हे, तर देशाच्या राजकारणातील झुंझार नेता आपण गमावला आहे. त्यांचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहे. मुंडे जरी राजकीय विरोधक असले तरी ते माझे वैयक्तिक मित्र होते." - आर. आर. पाटील

 • "महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवायची जिद्द मुंडे यांनी बाळगली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे राज्य आणणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल." - राम नाईक, माजी पेट्रोलियम मंत्री

 • "गेल्या 20 वर्षांत मी आणि मुंडे यांनी विविध पदांवर एकत्र काम केले आहे. मुंडे यांना सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये मुंडे यांचा अभ्यास होता. मुंडे हे हसत खेळत राजकारण करणारे नेता होते." - नारायण राणे

 • "गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने मी एक बंधुतुल्या मित्र गमावला आहे. मुंडेंना मंत्रीपद मिळाल्यानंतर महाराष्ट्राला त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. परंतु मुंडे यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर दु:खाची लाट पसरली आहे." - छगन भुजबळ, राष्ट्रवादी-काँग्रेस नेता

 • "गोरगरीबांच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे पितृछत्र हरपले आहे. महाराष्ट्रात भाजपाची पाळेमुळे खोलवर रुजविण्यात मुंडेंचा मोठा वाटा आहे." - आमदार सुधीर मुनगंटीवार

 • "भाजपाने आणि महाराष्ट्राने एक लढवय्या नेता गमावला आहे. मुंडे यांचा राजकीय कारकिर्दीचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. त्यांच्या संघर्षामुळेच महाराष्ट्रात 1995 मध्ये युतीची सत्ता आली. मुंडे यांच्या सततच्या संघर्षमय प्रवासाचा अंत होणे दुर्दैवी आहे." - विनोद तावडे

 • "गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने भाजपाचे नव्हे, तर साऱया देशाचे नुकसान झाले आहे." – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

 • "गोपीनाथ मुंडेंच्या निधनाची धक्कादायक बातमी समजताच या बातमीवर विश्वास बसेनासा झाला. गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या व्यक्तीने संघर्ष आणि इच्छाशक्तीच्या बळावर सकारात्मक राजकारण आणि समाजकारण केले आहे." - हर्षवर्धन पाटील

 • "गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राची नव्हे, तर देशाची हानी झाली आहे आणि ती कधीही भरून येणार नाही. मुंडे परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे." - सुनील प्रभू

 • "दिल्लीतील राज्याचे नेतृत्त्व म्हणून मुंडेंकडे पाहिले जात होते. ते तळागाळापर्यंत पोहोचणारे नेते होते. त्यांच्या जाण्याने शिवसेना-भाजपचे नुकसान झाले आहे." - संजय राऊत

 • "गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे." - सचिन अहिर